हा दुसरा आघात दोघांनाही, अविनाश आणि अवनी ला कोलमोडून टाकणारा होता… पुढचं सगळं अंधारमय होत. It was like a slap to their positive attitude, they had dared to remain positive, inspite all the setbacks they had received.

पण, आयुष्य तुम्हाला जगावच लागत, फार काळ शहामृग बनून मातीत तोंड खूपसून नाही बसता येत. काही सत्य ही गेंड्याची कातडी पांघरून झेलावी लागतात. हा कटू अनुभव कसाबसा पचवून अवनीश आणि अवनी परत निर्धाराने उभे राहिले.

अविनाश आणि अवनीची अवस्था ही संदीप खरे यांच्या या कवितेतून डोकावत होती:-

‘हे भलते अवघड असते

कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना

डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना

डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी

तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते

हे भलते अवघड असते’

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी

ओठांवर शीळ दिवाणी बेफिकीर पण थरथरती

पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले

मित्रांशी हसतानाही हे दु: ख चरचरत असते

हे भलते अवघड असते’

दिवस हळू हळू सरत होते, आठवणी, मुर्गजळा प्रमाणे धूसर होत होत्या… खोल वर रुतलेल्या जखमा, खपली धरू लागल्या, पावलं परत जरा भकम्म पडत होती, मनावरचा ताण वेळेनुसार कमी होत होता.

अविनाश आणि अवनी हे, एकामेकांना जपत, हसवत, पुढे चालत होते. निस्टलेले सुखाचे क्षण परत वेचत
होते, मन दुसरी कडे रमण्याचा प्रयत्न करत होते. खूप अवघड होते ते करणे,पण जोडीदार जर सोबत असेल तर मग अवघड क्षण ही चटकन निघून जातात. तुम्ही तुमच्या जोडीदार बरोबर किती ही भांडा, अबोला धरा पण सोबत कधी ही सोडू नका, अविनाश आणि अवनी तर आता, एकमेकांशी काही ही न बोलता, इशारे न करता, संवाद साधत होते. मनाने मनाशी केलेलातो संवाद होता, प्रेमाचे ते एक वेगळे रूप होते, स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू कमी कसे होणार, हे ते दोघेही पाहत होते, नोकरी मधे आपले आपले मन रमवत होते.

आपण मुल दतक घेऊया का? हा विचार दोघे ही करू लागले, या दरम्यान, दोघांनी, डॉक्टर वैद्य यांच्या सल्याने weight loss सुरु केले… डाएट चालू केले व मन शांती साठी, योगा पण सुरू केले… तसे दोघेही फिट होते, पण आता, तन आणि मन दोन्ही फिट करायचे होते. काहीही निर्णय पक्का करण्या आधी, तो निर्णय सर्वतोपरी निभवण्यास ते स्वतःला सक्षम करत होते.

One can be bodily fit, but if he/she is mentally weak, it affects the body also, म्हणून ते स्वतःला घडवत होते. मुल biological हवे की दत्तक हवे हा निर्णय त्या दोघांना घायच्या होता. सरते शेवटी, दोघांनी ठरवलं की एक चान्स घेऊ, बाकी पुढे बघु…

डिसेंबर २०१० ला अवनीने परत ती गोड बातमी दिली. अविनाश ने सर्व प्रथम डॉक्टर वैद्य यांची भेट घेतली, अवनीची केस हिस्टरी बघता, अवनी ला बेड रेस्ट कम्पल्सरी झाली. बाळ खाली येऊ नये म्हणून Cerclage सर्जरी पण केली, या वेळी दर १५ दिवसांनी सोनोग्राफी व आणखीन इंजेक्शन्स दिले गेले, दर दोन दिवसांनी एक इंजेक्शन्स… पण बाळासाठी अवनी हे सगळे निभावत होती, अवनी आणि अविनाश ला टेन्शन खूप होत, नको ते विचार डोक्यात येत होते, पण ते विचार न बोलता, ते दोघे सर्व खबरदारी घेत होते, या टेन्शन मुळे अवनीचे blood pressure खूप वर खाली होऊ लागले, खबरदारी म्हणून तिला मीठ न खाण्याचा सल्ला दिला गेला… पण अवनी ने मीठ खाऊ नये म्हणून घरात कुणीच मीठ खात नव्हत. घरात आळणी स्वयंपाक बनू लागला. एका हितचिंतकांनी सल्ला दिला की अवनी ने फक्त तिच्या सासरच्या घरी बनलेले जेवण करावे, मग अवनी च्या आईने लेकी साठी केलेले पदार्थ अविनाश सासूबाईनी कडून विकत घेऊ लागला. फक्त अवनी व बाळ सुखरूप व स्वस्थ असावे म्हणून सगळ्यांनी ते मान्य केले.

घरच्यांना सोडून कोणालाही अवनी गरोदर आहे हे सांगितले नव्हते. दिवस, आठवडे पुढे पुढे सरकत होते. दर सोनोग्राफी आणि चेकिंग नंतर, दोघेही थोडे थोडे नॉर्मल होत होते. डोहाळजेवन अवनीश – अवनी दोघांच्याही घरच्यांनी घरच्या घरी केले.

डॉक्टर वैद्य सासरच्या जवळ होते, म्हणून अवनी बाळंतपणासाठी माहेरी नाही गेली. अवनी ला तिच्या सासरचे सगळे खूप जपत होते, सासुबाई तिला सगळे घरीच खाऊ पिऊ करून देत होत्या, अवनीला काहीही त्रास होणार नाही हे बघत होत्या, त्या ९ महिन्यात, तिच्या सासुबाई, कुठे म्हणजे कुठचे गेल्या नाहीत, सगळे जण त्याच्या परीने सगळे व्यवस्थित पार पाडावे म्हणून झटत होता.

दर सोनोग्राफीमध्ये अवनीश आणि अवनीला बाळाची वाढ दिसत होती. अविनाश रोज बाळाशी बोलायचा, त्याने बाळाला बदकु, कसे नामकरण केले होते. अविनाश बोलू लागला की बाळ शांत व्हायचं, अविनाश बरोबर बाळ मस्ती करत आईला भरपूर लाथा मारायचे. सोनोग्राफी ला तर, बाळ इतके हलवायचे की डॉक्टर परेशान व्हायचे, मग बाबा बोलायचा बदकू, शांत हो डॉक्टरांना तपासू दे, मग बाळ शांत व्हायचं. बाळ सर्वांगाने व्यवस्थित वाढत होतं.

5 ऑगस्ट 2011, 9वा महिना नुकताच लागला होता. आज शेड्युल्ड सोनोग्राफी होती, सोनोग्राफी करताना डॉक्टर आज फार गंभीर होते, नेहमीसारखे संध्याकाळी रिपोर्ट देतो मग जा डॉक्टर वैद्यांकडे, असं न सांगता, ते अवनीश ला म्हणाले, तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता डॉक्टर वैद्यांकडे जा मी डॉक्टर वैद्यांना फोन करतो. अवनीश ने विचारले काही प्रॉब्लेम आहे का? मनात भीतीची एक कळ आली, पण डॉक्टर म्हणाले तू आत्ताच्या आत्ता डॉक्टर वैद्यांकडे जा.

तसेच दोघही डॉक्टर वैद्य यांच्याकडे आले, डॉक्टर वैद्य त्या दोघांची वाटच बघत होते, त्यांनी अवनी ला चेकिंग साठी आत मधल्या रूम मध्ये पाठवले, मग त्यांनी अविनाश ला सांगितले, अविनाश, बाळाला जाणारी ऑक्सिजनची एक नस, विरघळली आहे, बाळाचा ऑक्सिजन कमी झाले आहे,आपल्याला उद्याच Cesarean करावे लागेल. मी आज अवनी ला ऑक्सिजनचे इंजेक्शन्स देत आहे. पण नाळ विरघळण्याचे अवनी ला कळू देऊ नका. तिचा बीपी वाढण्याची शक्यता आहे.

डॉक्टर वैद्यांकडून अवनीश आणि अवनी घरी आले, अवनीश ने घरी अवनीच्या उपरोक्त घरच्यांना सर्व कल्पना दिली, सहा ऑगस्ट 2011 सकाळी साडेसहाला त्यांना डॉक्टर वैद्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं होत. अवनी ला खूप प्रश्न होते, की सगळं नॉर्मल आहे मग उद्याच सिझेरियन का करायचे, काहीतरी सांगून अविनाश तिला शांत करत होता.

सहा ऑगस्ट 2011, हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून अवनीशला हा सगळा भूतकाळ आठवत होता, आज त्याचे कान बाळाचा आवाज आणि डोळे बाळाला बघण्यासाठी आतुरले होते. बाळाच्या दोन्ही आज्या जप करत होत्या. आठ वाजून 45 मिनिट, अविनाश ज्या क्षणाची इतकी वाट बघत होता तो क्षण आला, बाळाच्या रडण्याचा आवाज स्पष्ट आला,अविनाश पळत ऑपरेशन थेटरच्या दाराजवळ गेला, एक नर्स बाळाला घेऊन त्याला आंघोळ घाला चालली होती, बाळ खूप रडत होत, नर्सने बाळाला आंघोळ घालून छान गुंडाळून अविनाश च्या हाती बाळाला दिले, अविनाश ने हळूच बाळाला कुशीत घेत बोलला ‘बदकू तू बाबा जवळ आहेस’ आणि बाळ लगेच शांत झाले,आवाजाच्या दिशेने बघत पाय मारू लागल. बाळालाही जसं काही बाबाला भेटण्याची घाई झाली होती. अविनाश आणि अवनी ला आभाळ ठेंगणे झाले होते. ज्या स्पर्शाला ते गेली ३ वर्ष मुकले होते, तो स्पर्श आज त्याच्या ओंजळीत होता. आज जणू आभाळ फाटून जगातले सर्व सुख त्याच्या कुशीत विसावले होते.

तो दिवस होता श्रावणी अष्टमीचा, देवीच्या रुपाने पिल्लू त्यांच्या घरी आल होतं. She was a gift to them from the heavens. They aptly named her Anaya… the gift of god…

तर अशी होती ही एका परीच्या जन्माची कथा.

– आदुश उवाच

ही गोष्ट माझ्या नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही

4 Responses

  1. अत्यंत हृदयस्पर्शी, यथार्थ कविता, शब्दांची अचूक योग्य निवड तथा मुद्देसुद मांडणी. भावस्पर्शी,मनाला भिडणारी कथा. लिखाण सुरूच ठेवा.

  2. Kai Surekh Katha.. Manala bhidnari.. Hrudyacha taba ghenari.. Kharach Etaka Surekh lekhan.. Tumcha kathan sathi Wat bghu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *