हळू हळू, अविनाश आणि अवनी परत पूर्व पदा वर येऊन नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होते… रोज रोज, लोकांना तीच तीच गोष्ट सांगून ते दोघे ही विट्टले होते… मग हवा पालट म्हणून ते दोघे मथेरनला भटकंती ला गेले…

जेथे त्यांना कोणीच ओळखत नव्हते… माथेरान चा निसर्ग, शुद्ध हवा आणि दिवसभर फक्तं ते दोघेच… हे समीकरण, त्या दोघांना ही परत नॉर्मल होण्यास खूप मदतगार ठरले… ४ दिवस आराम करून, निसर्गसौंदर्य बघून, शुद्ध हवा खाऊन, मनावरची मरगळ दूर झाली… एक निवांत पणा आला…

दोघानी आयुष परत नव्या जोमाने जगायचं हे ठरवलं… What happened, happened for the best and as per the wish of the almighty… ह्या वाक्य वर विश्वास ठेवून, आता जे झालं ते झालं, परत आता त्या आठवणी ओरबाडून रडायचे नाही, पण, ठरवणे आणि त्या प्रमाणे वागणे, थोडे अवघड होते… अवनी त्या मानाने लवकर recover झाली, अविनाश ला

जरा जास्त काळ लागला, तो थोडा डिप्रेशन मधे गेला, पण अवनीच्या खंबीर पाठांब्या मुळे, अविनाश सावरला, त्या दरम्यान, त्याची नोकरी पण गेली… खूप प्रात्यांती notice period च्या शेवटी शेवटी, घरा जवळ एक नवी नोकरी मिळाली…

नवीन सूर्वात, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मधे, एका आर्थी ते बरे झाले, कारण, नवीन सोबती, नवी आव्हाने या मुळे, अविनाश ला नवा जोम आणि नवी उमेद निर्माण झाली, ज्या मुळे आयुष परत सुरळीत चालू झाले…

मग, अविनाश आणि अवनी यांनी परत chance घ्याचा हे ठरवले, आणि coincidence की वर्षाच्या शेवटी अवनी ने परत ती गुड न्यूज दिली…

डॉक्टर वैद्य यांच्या डोळस निग्रणीत, उपचार सुरू झाले… पूर्व इतिहास लक्षात घेता, precautions जास्त घेतले जाऊ लागले. दिवस, आठवडे हळू हळू पुढे जाऊ लागले. दर महिना सोनोग्राफी हाऊ लागली.

मागच्या वेळी, rubella virus मुळे गर्भपात झाला होता, त्या मुळे, तो होऊ नये म्हणून vaccination दिली गेले. तसा हा व्हायरस झाला तर थोडा ताप येतो आणि थोडे पुरळ येतात, पण प्रथम ट्राय सेमेस्टर मध्ये झाले तर गर्भपात होतो.

सर्व उपचार एकदम योग्य पद्धती ने चालू होते, एक एक महिना जसा जसा पुढे सरकत होता, तसा मनावरचा ताण कमी होत होता…

मग एप्रिल महिना आला, सर्व रिपोर्ट्स आता पर्यंत नॉर्मल होते, बाळ, अवनी दोघे ही एकदम नॉर्मल होते, ६वा महिना चालू होता. अविनाश आणि अवनी आता पुढच्या महिन्यात डोहोळा जेवण कसे करायचे याचे planning करत होते. अविनाश चे आई – बाबा, दोघेही काही कामा साठी बाहेर गावी गेले होते, ते दोघेही आम्ही जात नाही, मग नंतर जाऊ सांगत होते, पण आता काही धोका नाही आहे, आणि तुम्ही १ आठवडा तर जाणार आहात, काही होणार नाही, तुम्ही जा, आसे सांगून अविनाश ने दोघांना पाठवले.

२२ एप्रिल २००९, ला सकाळी अवनी ला पोटात थोडे दुखले, लगेच, अविनाशने अवनीला डॉक्टर वैद्य यांच्या कडे नेले, डॉक्टर यांनी सर्व तपासण्या केल्या, अवानीला checking room मध्ये थांबवून, डॉक्टर अविनाशला भेटायला बाहेर आले. त्याचा चेहरा बघून अविनाश अस्वस्थ झाला, डॉक्टरांनी त्याला स्पष्ट कल्पना दिली, नाळ विघटित झाली आहे, असे फार क्वचित होते. बरं हे विघटण नॉर्मली सोनोग्राफी मध्ये दिसत ही नाही, त्या मुळे, हे जेव्हा होते, त्या वेळी, बाळाची वाढ बघून निर्णय घ्यावा लागतो, बाळ गर्भात फक्त ६ महिने होते, त्याची पूर्ण वाढ झाली न्हवती.

अविनाशला सकाळी १० वाजता कळले होते, की बाळ(परी), हे जग सोडून गेले आहे, अवनिला हे तो सांगू शकत न्हवता, डॉक्टरनी मना केले होते.

अवनी आता अस्वस्थ झाली होती, ती डॉक्टरांना खरे सांगा म्हणून रडायला लागली… आपण काहीही करू शकतो, बाळाला इनक्यूबेटर मध्ये ठेवू, पण बाळाला वाचवा, पण आता फार उशीर झाला होता…बाळ अविनाश आणि अवानिला सोडून देवाघरी गेले होते. त्यांची परी परत खोडकर खेळ करून गायब झाली…

अवनीचे आई-बाबा, अविनाश ने फोन करताच लगेच निघाले, पण ते दोन तास, एकट्या मध्ये अविनाशला फार भारी गेले, तो अवनीला फक्त दारा आडून बघू शकत होता.

तो खंबीर होण्याचे नाटक करत होता, कारण अवनीला त्याला सांभाळण्याचे होते. तिच्या समोर तो त्या परिस्थितीत डगमगू शकत नव्हता. तो आतल्या आत गुदमरत होता, पण तो खंबीर उभा होता, अवनीला गर्भपातामुळे ग्लयनी आली व त्या मुळे अवनी झोपली.

अवनी चे आई-बाबा व भाऊ आले, आईने अवनीला जवळ केले व शांतपणे त्या तिला थोपटू लागल्या. आईच्या कुशीत अवनी ने आश्रूना मोकळी वाट केली… हा आघात फार जीवघेणा होता, आई होण्याची स्वप्नं दुसऱ्यांदा खंडित झाल होत. तिच्या मनावर डेप्रेशन हावी होऊ पाहत होते. पण आत्ता अवनीला पहिले शांत करायचे होते… भरपूर मानसिक आधार द्याचा होता, औषध शारीरिक आजार दूर करणार होते पण मनावरचे आघात हे घरच्यांच्या प्रेमाने व काळाच्या ओघात कमी होणार होते, त्यासाठी फक्त वेळ आणि प्रेम भरपूर प्रमाणात दिले गेले पाहिजे होते.

अविनाश मात्र अवनी चे आई-बाबा आल्यावरही खंबीर उभा होता. त्याला स्वतःचं टेन्शन सासू-सासर्‍यांना द्यायचं नव्हतं. अविनाश आतून कितीही रडत असला तरी वरकरणी तो सगळ्यांना शांत दिसत होता, अविनाशची मनस्थिती तशी ढासळली होती पण अवनी साठी तो स्वतःला सावरत होता. काळाने दुसऱ्यांदा त्याचे बाप होण्याचे स्वप्न एका क्षणत उध्वस्त केले होते, तो आतून कोसळला होता. जेव्हा मनातलं ऐकणारा साथीदार, स्वतः हळवा झालो असतो तेव्हा मनातलं बोलायचं कुठे, अश्रू पुसणारा जेव्हा स्वतःचे अश्रु ढाळत असतो मग आपण रडायचं कसं, आपले दुःख त्याच्यासमोर मांडायचे कसं.

डॉक्टर वैद्य ने बाळाला, सॉरी बाळाच्या डेड बॉडी ला अविनाशच्या स्वाधीन केले. मग अविनाश आणि अवनीचा भाऊ हे दोघे बाळाला घेऊन स्मशानभूमीत गेले. लहान बाळांना जाळत नाहीत तर कपड्यामध्ये गुंडाळून, धरती मातेच्या कुशीत निजवतात. हे सर्व करताना अवनीश बाळाचा चेहरा फक्त बघत होता, बाळ अगदी शांत झोपल्या सारखं डोळे मिटून अविनाश च्या हातात होते… बाळाचा चेहरा अविनाशच्या मनातच नाही तर हृदयाच्या वर कोरला गेला. बाळाला धरणी मातेच्या कुशीत ठेवताना आणि मूठमाती देताना अविनाश थरथरत होता, पण ते करणे गरजेचे होते. अवनीला एक सुख मात्र होत, तिने बाळाचा चेहरा पाहिला नव्हता. नसलेला चेहरा तुम्हाला कमी त्रास देतो, पण हृदयात कोरलेला चेहरा, परत कधीच दिसणार नाही तर जास्त त्रास होतो.

जग नेहमी आईच्या भावनांना वाचा देतो, पण बापाच्या भावनांचं काय…

क्रमशः

– आदुष उवाच ही कथा माझ्या नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही

5 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *