6 ऑगस्ट 2011, पहाटे साडेसहाला अविनाशने, अवनी ला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. ऍडमिशन फॉर्म पूर्ण करून डॉक्टरांनी अवनी ला ऑपरेशन थेटर मध्ये घेतले. डॉक्टर वैद्य नावाजलेले सर्जन, जाताना सांगून गेले अविनाश काळजी करू नकोस सगळं सुरळीत होईल.

अविनाश थोडासा हसला आणि कॉरिडॉरमध्ये ऑपरेशन संपण्याची वाट बघत बसला. ऑपरेशन म्हणजे तसं cesarean होतं, डॉक्टरांच्या मते एकदम सोपी प्रोसिजर, पण अविनाश थोडा टेन्शनमध्ये होता, नको त्या शंका मनामध्ये पिंगा घालत होत्या.

तो एकदम तीन वर्ष मागे गेला. जानवरी महिना साल 2008, अवनी आणि अविनाश यांचं लग्न झालं. पहिलं वर्ष मस्त एन्जॉय केलं, खूप ठिकाणी फिरले… लग्नानंतर चे ते सोनेरी क्षण, एकमेकांची ओळख वाढवत संसार मस्त चालला होता, लग्नाचा पहिलेच वर्ष, सण पण पहिलेच, डबल एन्जॉयमेंट… 2008 वर्ष संपता संपता, दोघांनी फॅमिली प्लॅनिंगचा विचार बाजूला ठेवला. डिसेंबर मध्ये अवनी ने हळूच एक गुड न्यूज दिली… अवनीश बाप होणार होता, मग डॉक्टरांची अपॉइंटमेंट, टेस्ट, औषध, काय करायचं काय नाही याचे सल्ले, सगळं सुरळीत चालू झाल.

सगळं नॉर्मल होत, बाळ, कळा कळा ने रूजत होत, फुलत होत… अवनी सगळे प्रिकॉशन आणि औषध रेग्युलरली पाळत होती. गोडी गुलाबी चे हप्ता बघता दोन महिने संपले, मग मार्च महिना, पहिली सोनोग्राफी, सोनोग्राफी तशी नॉर्मल, रिपोर्ट नॉर्मल. पण त्याच दिवशी सायंकाळी अवनीला असे वाटले की थोडं बिल्डींग झालं, म्हणून अवनीश आणि अवनी डॉक्टर जोशीकडे गेले, डॉक्टरांनी चेक केलं आणि म्हणाले होत अस कधी, it’s called vanishing twins… तुम्हाला जुळी मुलं होती आणि एक आधीच निघून गेला… This was a shock to both Avinash and Avni… This was never thought by them. The casual behaviour of Dr. Joshi was a bit of a shock.

चला, पण एक मुल तर व्यवस्थित आहे, ही आशा बाळगून दोघे घरी आले. ती रात्र आणि दुसरा दिवस तसा उदास उदासच गेला. मन फार विचित्र असतं, सगळंच हवं असतं, पण नियतीपुढे कोण काय करू शकतो. दुसऱ्या दिवशी सायंकाळी, अवनी ला पोटात कळा येऊ लागल्या, अगदी असह्य, प्रस्तुती च्या वेळी येतात तशा. डॉक्टर जोशीना फोन केला त्या बोलल्या काळजी करू नका रिपोर्ट नॉर्मल आहेत गोळ्या घ्या, त्रास कमी होईल.

पण तसे झाले नाही, मनातली भीती खरी ठरली, अवनी चा गर्भपात झाला… तीन महिन्याचे गर्भ देवाघरी निघून गेले… अविनाश ने, त्याच्या आईच्या सोबतीने अवनी ला दुसऱ्या डॉक्टरांकडे नेले, परिस्थिती ओळखून डॉक्टर वैद्यनी अवनी ला योग्य ती ट्रीटमेंट चालू केली. Blood samples व बाकी टेस्ट केले.

टेस्ट रिपोर्ट यायला वेळ लागणार होता, पण अवनीश आणि अवनी यांच्या मनाची स्थिती फार नाजूक होती, काय झालंय कळतच नव्हतं. आत्ता कुठे आपण आई बाप आहोत ही भावना मनात रुजू घालत होती, मनाचे स्वप्न पूर्ण व्हायच्या आतच कोणीतरी दुष्टपणे त्या स्वप्नाला काळोखात नष्ट केलं होतं… असं वाटत होतं की एक खोल विवर आहे आणि कोणीतरी निष्ठूरपणे सगळी स्वप्न त्या खोल विवरात भिरकावून दिली आहेत… डोक्यात कुठलाच विचार नव्हता, काय झालंय हे कळतच नव्हतं, काय चुकलं आपलं माहित नव्हतं. सगळीकडे कशी एक भयानक स्मशान शांतता पसरली होती. अवनीश आणि अवनी, एकमेका समोर रडत नव्हते पण बोलत सुद्धा नव्हते… एकाप्रकारे दोघेही शांततेत एकमेकांशी हितगुज करत होते… एक पोकळी निर्माण झाली होती, रडून-रडून डोळेही कोरडे झाले होते, दोघेही एकामेकांना जपून पुढे जाण्याचा मार्ग शोधत होती… खूप खूप मौल्यवान भावना जेव्हा चेचली जाते, तेव्हा जे घाव लागतात ते फार खोलवर ठसा उमटवतात. लोक म्हणतात वेळ तुमच्या घावांवर फुंकर मारतो, पण नाही, काही घाव हे कधीच बरे होत नाहीत… माणूस जगासमोर फार कणखर वागतो पण आपल्या साथीदारांसोबत तो खरा असतो, डोळ्यातले अश्रू हे फक्त आणि फक्त साथीदारा समोर पाझरतात.

आठवण म्हणून त्या पिल्लासाठी दोघेही एक बट मोगऱ्याचे झाड लावले, झाडाशी बोलताना आपण पिल्लाशी बोलतोय, असं मनाला भासवतात. ते झाड सुद्धा खट्याळ निघाले, अगदी पिल्लासारखा, ते बरोबर मार्च आणि एप्रिल या महिन्यात दरवर्षी न चुकता बहर्ते… जणू मी आहे, हे पिल्लू दरवर्षी आई-बाबांना सांगते …

कर्मश:

– आदुष उवाच

ही कथा माझ्या नावासकट शेअर करण्यास माझी हरकत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *